जेव्हा तुम्ही तुमचा iPad पहिल्यांदा चालू करता तेव्हा हॅलो स्क्रीन दिसते.

सुरू करणे

तुम्ही तुमचा नवीन iPad वापरणे सुरू करण्यापूर्वी काही मूलभूत फीचर सेट अप करा.

बेसिक सेटअप करा

संपूर्ण स्क्रीनभर पृथ्वीचे छायाचित्र असलेली iPad लॉक स्क्रीन. डाव्या बाजूला घड्याळ, दिनदर्शिका, रिमाइंडर, हवामान आणि Apple Pencil बॅटरीसाठी विजेट आहेत.

पर्सनल टच समाविष्ट करणे

तुमचा iPad तुमची शैली, आवडी आणि डिस्प्ले प्राधान्ये प्रतिबिंबित करू शकतो. लॉक स्क्रीन कस्टमाइझ करा, होम स्क्रीनवर विजेट समाविष्ट करा, टेक्स्ट आकार ॲडजस्ट करा आणि इतर बरेच काही करा.

तुमच्या iPad तुमच्या आवश्यकतेनुसार बनवा

चार सहभागींसह गटाचा FaceTime कॉल. स्पीकर, कॅमेरा, म्यूट, शेअर आणि एण्ड ह्या बटणांसह FaceTime कंट्रोल तळाशी डावीकडे आहेत. कॉल करणाऱ्या व्यक्तीची इमेज खाली उजव्या बाजूला एका छोट्या आयतामध्ये दिसते.

संपर्कात राहणे

iPad मुळे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे सोपे होते. ‘संदेश’ मध्ये संभाषण सुरू करा, FaceTime कॉल करा, अगदी चित्रपट पहाणे आणि संगीत ऐकणेही आता एकत्रितपणे करा.

फ्रेंड्स आणि कुटुंबाच्या संपर्कात रहा

‘स्टेज मॅनेजर’ सह iPad डिस्प्ले चालू आहे. सध्याच्या विंडो स्क्रीनच्या मध्यभागी आहेत आणि इतर अलीकडील ॲप स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या यादीत आहेत.

iPad सह एकाच वेळी अनेक कामे करणे

एकाच वेळी अनेक ॲपसह कसे काम करायचे आणि तुम्ही सर्वाधिक वापरत असलेल्या ॲपमध्ये स्विच कसे करायचे, ते जाणून घ्या.

तुमची वर्कस्पेस कस्टमाइझ करा

वनस्पतींची रेखाचित्रे असलेला आणि तळाशी ड्रॉईंग टूल असलेला Freeform बोर्ड.

तुमची सर्जनशीलता वाढवणे

Apple Pencil सह स्वतःला व्यक्त करण्याचे नवनवीन मार्ग शोधा.

Apple Pencil वापरून बरेच काही करा

iPad यूझर गाइड एक्सप्लोअर करण्यासाठी, पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘अनुक्रमणिका’ वर क्लिक करा किंवा सर्च फील्डमध्ये एखादा शब्द किंवा वाक्यांश प्रविष्ट करा.

उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.