Apple Intelligence सुरू करणे
जर Apple Intelligence बंद असेल, तर तुम्ही ते सुरू करू शकता.
सेटिंग
> ‘Apple Intelligence व Siri’ वर जा.
पुढीलपैकी कोणतेही एक करा :
Apple Intelligence च्या पुढील बटणावर टॅप करा.
‘Apple Intelligence सुरू करा’ वर टॅप करा.
तुम्हाला दिसणारा पर्याय तुमच्याकडे असलेल्या iOS च्या व्हर्जनवर आणि तुम्ही पूर्वी Apple Intelligence सेट अप केले आहे का ह्यावर आधारित आहे.
नोट : Apple Intelligence तुमच्या डिव्हाइस, भाषा आणि प्रदेशासाठी उपलब्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी, Apple Intelligence कसे मिळवायचे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.